पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्ससीन नौकां मालवण समुद्रात पकडल्या.

21

 

देवगड | प्रतिनिधी

पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्ससीन नौकां मालवण समुद्रात पकडल्या.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांची धडक कारवाई ; नौका जप्त करून पुढील कार्यवाही सुरु
:महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अंदाजे ६ ते ७ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या पर्ससीन नेटव्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्ससीन नौकांवर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील असलेल्या पर्ससीन नौका सफा मारवा ३ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२६२, नौका राबिया अब्दुल लतिफ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२००, व नौका जलसफा २ नों. क्र.- IND-MH-४-MM-६००५ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अंदाजे ६ ते ७ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या पर्ससीन नेटव्दारे मासेमारी करत असताना पकडले. या तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ५५ ते ६५ खलाशी आहेत.
सदर नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणाऱ्या मासळीचा लिलाव ९ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात येत आहे. सदर नौकांना लाखों रुपये दंड होण्याची शक्यता आहे.
अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.