आचरा-अर्जुन बापर्डेकर
आडवली नं. 1शाळेत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जगारुकता आणि संवेदनशीलता निर्माण व्हावी आणि सणसमारंभ पर्यावरणास हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने साजरे करता येण्याची मानसिकता विकसित करण्याच्या व्यापक हेतूने आनंदादायी शनिवार अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली.
सदरच्या कार्यशाळेचे आयोजन शाळेत कार्यरत असलेल्या ईको क्लबच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यशाळेत ५०विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविल्या. या अनुषंगाने गणेशमूर्ती बनविणे स्पर्धा आडवली मालडी ग्रामविकास मंचच्या वतीने प्रयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे शिक्षक कुबल यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. रामचंद्र कुबल, श्रीम. तनुजा तांबे, श्रीम. रागिणी ठाकूर आणि श्रीम. वेदिका वाघाटे यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यावरण जाणीव विकसित करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





