देवगड (प्रतिनिधी)
शेवटच्या श्रावणी सोमवारीही भाविकांची कुणकेश्वर शिवतीर्थावर गर्दी
चौथ्या श्रावण सोमवारी श्री देव कुणकेश्वर प्रथम पूजेचा मान तहसीलदार पवार ,व नेव्ही ऑफिसर मंगेश दळवी व उद्योजक शिरीष शिरसाठ यांना
श्रावण महिन्यातील चौथा सोमवार औचित्य साधून श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात पहाटे पाच वाजता पारंपरिक विधी-अर्चनांसह पहिली पूजा पार पडली. ही प्रथम पूजा देवगड तहसीलदार आर. जे. पवार, नेव्ही ऑफिसर श्री. मंगेश दळवी तसेच मुंबई येथील उद्योजक श्री. शिरीष शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आली.
पूजा संपल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनास सुरुवात करण्यात आली. पावसाचे वातावरण असूनही चौथ्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदिर परिसर गजबजून गेला.
यावेळी भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाचा लाभ घेतला. चारही श्रावण सोमवारच्या दिवशी भाविकांची झालेली गर्दी सुरळीत पार पडण्यासाठी शासन प्रशासन, पोलीस विभाग आणि एसटी प्रशासन, भाविक , भजनीबुवा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने एकनाथ तेली यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.





