भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी महेश सारंग, संदीप साटम यांची तर युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी संदीप मेस्त्री यांची फेरनियुक्ती

18

 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी महेश सारंग,संदीप साटम यांची तर युवामोर्चा जिल्हाध्यक्षपदी संदीप मेस्त्री यांची फेरनियुक्ती

भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून यात महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या झाल्या आहेत.
सावंतवाडी येथील महेश सारंग यांची पुन्हा एकदा जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातील शिरगाव येथील संदीप साटम यांचीही जिल्हा सरचिटणीस पदावर फेरनिवड करण्यात आली.यापूर्वी दोघांनीही सरचिटणीस पदावर काम पाहिले असून त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक कौशल्याचा पक्षाला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या या फेरनियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचबरोबर कणकवली तालुक्यातून संदीप मेस्त्री यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी, फेरनियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केलेल्या या नव्या कार्यकारिणीमुळे आगामी काळात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.