बेकायदेशीर आंदोलन करून महामार्ग रोखल्यामुळे उबाठा सेनेच्या २१ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर,बाबुराव धुरी, यांच्या सह ८० ते ९० जणांवर गुन्हा
महामार्ग रोखल्यामुळे जनतेची झाली होती गैरसोय पोलिस प्रशासनाने केली कारवाई सुरू
सिंधुनगरी प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर हूमरमळा येथे राजकीय आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत करणाऱ्या व नागरिकांची गैरसोय करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह २१ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत अटक केली आहे. याशिवाय या बेकायदेशीर आंदोलनात सहभाग घेणाऱ्या ८० ते ९० आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
बुधवारी महामार्गावर उबाठा सेनेने हे बेकायदेशीर चक्काजाम आंदोलन केले. सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 40/2025 भारतीय न्याय संहिता कलम 2023 कलम.126(2),189(2),190, 223 प्रमाणे फिर्यादी- ओमकार दिगंबर माडये, वय – 30 वर्षे, सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे,तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग, यांनी हा गुन्हा दाखल केला.
आरोपी क्रमांक 1 ते 21 वगैरे असे एकूण 80 ते 90 महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तसेच महामार्गावर पडलेले खड्डे या अनुषंगाने चक्काजाम आंदोलन करिता दिलेल्या नोटीसचे उल्लंघन करून आंदोलनास परवानगी नसताना गैर कायदेशीर जमाव जमा करून मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग अडवून धरून सार्वजनिक शांतता भंग केली तसेच सदर राष्ट्रीय महामार्ग बेकायदेशीर आडवून लोकांची गैरसोय केली म्हणून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी म्हणून या आंदोलनात सहभागी झालेले 1) वैभव विजय नाईक, राहणार. कणकवली 2) सतीश जगन्नाथ सावंत, राहणार.कणकवली 3) संदेश पारकर, राहणार. कणकवली 4) बाबुराव धुरी, राहणार. दोडामार्ग 5) सुशांत श्रीधर नाईक,राहणार. कणकवली, बिजलीनगर 6) परशुराम उर्फ जीजी प्रभाकर उपरकर, राहणार. कणकवली 7) रवींद्र नामदेव कदम, राहणार. ओरोस, खरेवाडी 8) नागेश ओरसकर, राहणार. ओरस, देऊळवाडी 9) श्रीमती श्रेया चंद्रकांत परब, राहणार. वक्रतुंड प्लाझा,कुडाळ 10) राजन शिवराम नाईक, राहणार. कुडाळ, भैरववाडी 11) जय भारत प्रतापराव पालव,राहणार.पालववाडी, हूमरमळा 12) सुरेंद्र नारायण उर्फ आप्पा मांजरेकर, राहणार.आणाव 13) समीर दिनकर पालव, राहणार. हुमरमळा, गावठाणवाडी 14) मंदार श्रीकृष्ण शिरसाठ, राहणार. कुडाळ 15)अमरसिंह पुष्पसैन सावंत, राहणार. कुडाळ, भैरववाडी 16) संतोष नरहरी शिरसाट, राहणार. कुडाळ 17) बबन दत्ताराम बोभाटे, राहणार. कुडाळ 18) संजना रामचंद्र कोलते, राहणार. कणकवली 19) माधवी ज्ञानेश्वर दळवी, राहणार. कणकवली 20) वैदेही गुडेकर, राहणार. कणकवली 21) मंजुनाथ सुभाष फडके, राहणार. नेरूळ, कुडाळ यांना पोलिसांनी अटक केली असून उशिराने जामिनावर सोडले आहे.