विनयभंगप्रकरणी सश्रम कारावास..!

कणकवली : तालुक्यातील एका महीलेचा गुन्हयातील आरोपी सूर्यकांत चव्हाण मीटर रींडीग घेण्याचा बहाणा करत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सरकार तर्फे सरकारी वकील नितीन कुंटे व तात्कालीन सरकारी वकील अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

कणकवली पोलिस ठाण्यातील भादवी कलम ४५१, ३५४, ३२३ अन्वये गुन्हयातील आरोपी सूर्यकांत चव्हाण वय (वय – ३५ रा. ओरोस ) याला महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाचे न्यायाधीश शेख यानी दोषी धरून आरोपीस क. ४५१ साठी एक वर्ष, ३५४ साठी एक वर्ष, ३२३ साठी ६ महीने सश्रम कारावास व एकूण शिक्षा ही दोन वर्षे सहा महिने तर ५००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील व पोलीस नितीन बनसोडे यांनी केला आहे.