श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी गंजिफा कलेला प्राप्त करून दिली उर्जितावस्था – डॉ. माणिकराव साळुंखे 

7

 

सावंतवाडी (मंगल कामत)

 श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी गंजिफा कलेला प्राप्त करून दिली उर्जितावस्था – डॉ. माणिकराव साळुंखे 

श्रीमंत शिवरामराजे भोंसले हे अतिशय बुद्धिमान, अनेक कलांमध्ये पारंगत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व होते. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यासोबतच त्यांनी गंजिफा सारख्या कलेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी काढले.
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे आज बुधवारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल, हीज हायनेस, राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची 98 वी जयंती ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर साळुंखे बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे होते. याप्रसंगी राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, सौ. कमल साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, संस्थानप्रेमी नागरीक ,सामाजिक कार्यकर्ते श्री. अण्णा केसरकर, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. अन्वर खान, श्री. मंगेश तळवणेकर, ॲड. संदीप निंबाळकर ,श्री. यशवंत देसाई , श्री. भरत नार्वेकर,लॉ कॉलेजच्या प्राचार्या सौ. अश्विनी वेंगुर्लेकर, मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अनुजा साळगावकर, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ स्मिता सुरवसे , सौ.रमा सावंत, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथी माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना, कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यामध्ये माणसासाठी वरदान ठरणारी आहे ,परंतु यामुळे अनेक नोकऱ्या जाण्याचाही धोका संभवू शकतो अशी भिती व्यक्त केली. टीसीएस सारख्या कंपनीने आपले बारा हजार कर्मचारी कमी केले हे त्याचेच उदाहरण आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाला पर्याय ठरू शकत नाही कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने इंटरनेटवर असलेला डेटा याचे एनालिसिस करून त्याप्रमाणे माहिती देण्याचे काम ती करत असली तरी मानवी भावभावना, प्रज्ञा, आदर्श ,संस्कार यांची जागा ते घेऊ शकत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता नवनिर्मिती करू शकत नाही. त्यासाठी प्रज्ञावंत माणसांचीच गरज आहे. असे डॉक्टर साळुंखे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले की, आमच्या राजघराण्याने सदैव जनतेचा सर्वांगीण विकास हे लक्ष ठेवून या भागामध्ये सुधारणा केल्या, त्याचाच परिणाम असा आहे की या क्षेत्रामध्ये विविध रोजगार व प्रगती दिसत आहे. शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवावे व विद्यार्थ्यांना नेहमी आजच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी चांगले मार्गदर्शन करावे.
विद्यार्थ्यानीही बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगती करावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. पूनम सावंत यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. यू सी पाटील यांनी तर आभार प्राध्यापक डॉ. यु. आर. पवार यांनी मानले.