देवगड हायस्कूल मध्ये राखी विक्री व प्रदर्शनाला पालकांचा उत्तम प्रतिसाद 

68

 

देवगड (प्रतिनिधी )

देवगड हायस्कूल मध्ये राखी विक्री व प्रदर्शनाला पालकांचा उत्तम प्रतिसाद 

    देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये राखी विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्‌घाटन स्थानिय समिती सदस्य विलास रुमडे यांच्या हस्ते करण्यात आले .यामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता नववीच्या १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून ९५ स्टॉल मांडले होते .विद्यार्थ्याने विविध आकाराचे, विविध रंगाचे ,विविध साधनांचा वापर करून टाकाऊ पासून टिकाऊ राख्या तयार करून आणल्या होत्या.
यावेळी विलास रूमडे यांनी शिक्षक वर्गाकडून अशाच प्रकारे अधिकाधिक चांगले उपक्रम राबवावे .आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन केले .मुख्याध्यापक प्रवीण खडककर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे संस्थाचालक व पालकवर्गाकडून कौतुक करण्यात आले .राखी प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमासाठी अमृता किरकिरे, पूजा गोसावी या शिक्षिकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आफरीन पठाण यांनी मानले.