आरोंदा येथे 4 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

81

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

आरोंदा येथे 4 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महसूल मंडळ आजगाव मधील गाव आरोंदा येथे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिबीराचे आयोजन ग्रामोन्नती मंडळ हॉल, आरोंदा येथे केलेले आहे. सदर शिबिरात मंडळ आजगाव मधील आजगाव, आरोंदा, भटपावणी,मळेवाड ,तळवणे ,धाकोरे ,तिरोडा, नाणोस,कोंडूरे,सावरजुवा, गुळदुवे, किनळे या गावातील ग्रामस्थांना महसूल विभागाकडील विविध दाखले वाटप करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाशी संबधित अर्जाशी निगडीत कागदपत्रांची माहिती देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमात १) पुरवठा पत्रिका वाटप २) संजय गांधी निराधार योजना मंजुर प्रकरणांचे वाटप ३) उत्‍पन्‍न दाखल्‍याचे वाटप ४) जातीच्‍या दाखल्‍यांचे वाटप ५) लक्ष्‍मी योजना लाभार्थ्याना ७/१२ वितरण ६) शेतकरी दाखले वितरण ७) अभिलेखातील दुरुस्‍तीसाठी कलम १५५ खालील दुरुस्‍तीचे आदेश व ७/१२ वितरण ८) राजपत्रानुसार ७/१२ अभिलेखात नावात बदल ९) ई पिकपहाणी १०) अॅग्रीस्‍टेक अशा विविध प्रकारचे दाखले वितरीत होणार आहेत . तरी सदर शिबिरास वरील गावातील सर्व ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा कॉलेज यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन श्री. कैलास गावडे मंडळ अधिकारी आजगाव, श्री. धोंडी पास्ते ग्राम महसूल अधिकारी आरोंदा, श्री. नागराज चंद्राप्पागोळ ग्राम महसूल अधिकारी आजगाव, श्रीम. अनुजा भास्कर ग्राम महसूल अधिकारी मळेवाड,श्री. संदीप मुळीक ग्राम महसूल अधिकारी तळवणे, श्री. प्रदिप बर्गे ग्राम महसूल अधिकारी तिरोडा यांनी केलेले आहे.