खाऊचे पैसे वाचवले अन वाढदिवसाच्या निमित्त जवानांना राख्या पाठवल्या

12

 

कोल्हापूर (अमोल गायकवाड)

खाऊचे पैसे वाचवले अन वाढदिवसाच्या निमित्त जवानांना राख्या पाठवल्या.

कोल्हापूरातील सिद्धावी सोनल शैलेश साळोखे या मुलीचा कौतुकास्पद उपक्रम..
कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी सीमेवरील जवानांसाठी एक राखी हा अभिनव उपक्रम राबवला जातो. या उपक्रमासाठी कोल्हापुरातील चिमुकलीने वर्षभर नातेवाइक, मित्रमंडळी यांनी खाऊ साठी दिलेले पैसे साठवले आणि वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमासाठी तब्ब्ल १००१ राख्या खरेदी करून कु. सिद्धावी साळोखे हिने सुपूर्द केल्या.
बालवयातच समाजकार्याची आवड जोपसत ह्या चिमुकलीने केलेल्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत.

 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कृष्णा लोंढे, सिद्धावीचे वडील युवा सेना उत्तर मतदार संघाचे अध्यक्ष शैलेश साळोखे, आई सोनल साळोखे, संगीता शरदराव साळोखे, पिंटू साळोखे, शिवसेना विभाग प्रमुख विनोद हजारे उपस्थित होते.