कणकवली (प्रतिनिधी)
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी प्रणय बांदिवडेकर यांची निवड
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी युवा उद्योजक प्रणय बांदिवडेकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक पदी वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथील युवा उद्योजक प्रणय बांदिवडेकर यांची निवड संघटनेच्या मुख्य कार्यालय पुणे येथे जाहीर करण्यात आली. प्रणय बांदिवडेकर यांनी गेली.
दोन वर्ष संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवले आहेत. गेली दोन वर्षे संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन्ही पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधून केलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन त्यांना सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीने पुणे येथे संघटनेचे मुख्य कार्यालय येथे जाहीर केली.
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्यावर प्रणय बांदिवडेकर यांनी दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य यांच्यांत योग्य समन्वय साधून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटकनात्मक कौशल्याने सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.
त्यांचे संघटनेच्या वतीने नियुक्त पत्र पुणे येथील राष्ट्रीय कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी एम्.डी.चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष- खंडूदेव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष- -प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक- रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष- सुभाष कोठारी, उपाध्यक्ष- लक्ष्मण दवणे, निरीक्षक- घनःश्याम सांडीम, कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, मुळशी तालुकाध्यक्ष- विशाल भानुसे, सचिव- आदिनाथ बुचडे, सल्लागार- जय हिंद सुतार, कार्याध्यक्ष- लक्ष्मण मोरे उपस्थित होते.
प्रणय बांदिवडेकर यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग समन्वयक पदी निवड झाल्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणी, राज्य कार्यकारणी, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका कार्यकारणी तसेच मित्र मंडळी व सर्वंच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.






