सावंतवाडी (प्रतिनिधी)
डॉ. अनिल जिजाबाई सरमळकर यांची दोन इंग्रजी नाटके जगविख्यात कोलंबिया विद्यापीठात, अनिल सरमळकर यांनी दिली माहिती
कोकणचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार डॉ. अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर यांची The Fox व It’s Already Tomorrow ही दोन्ही इंग्रजी नाटके टॉप वर्ल्ड रॅंक असणाऱ्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या नाट्य विभागात विद्यापीठाच्या २०२६ / २७ च्या नाट्य सिजन साठी विचारार्थ स्विकारली गेली आहेत.
कोलंबिया विद्यापीठ हे अमेरिकेतील गेल्या कित्येक पिढ्यांपासून साहित्य कला तत्त्वज्ञान ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान मानव्यविद्या इत्यादींचे जागतिक केंद्र मानले जात असुन आजवर या विद्यापीठातुन खुप मोठी व्यक्तित्वे निर्माण झाली आहेत. आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही शिक्षण कोलंबिया विद्यापीठात झाले आहे. अशा ज्ञानाचे वैश्विक केंद्र असलेल्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. अनिल सरमळकर यांच्या नाट्यलेखनची दखल घेतली गेल्याने
त्यांचे लेखन सातत्याने जागतिक स्तरावर येत असुन The Fox या नाटकाने त्यांना मिळवुन दिलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तिमध्ये अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अनिल यांचा सातत्याने आंतरराष्ट्रीय विद्यापीठे लेखक कवी विचारवंत इत्यादींशी संपर्क आहे त्यातूनच त्यांच्या लेखनाची दखल घेतली जात आहे.
डॉ. अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर यांचा इथवरचा प्रवास अत्यंत थरारक असुन त्यांनी सर्व प्रतिकूलतेशी झुंज दिली आहे. एका दुर्गम गावात दलित कुटुंबात जन्म झालेले अनिल कांबळे सरमळकर शाळकरी वयातच लेखनाकडे वळले. तथापि त्यांना अनेक अडचणीवर मात करुन सातत्याने साहित्य रंगभूमी कला इत्यादिचा व्यासंग करावा लागला आहे.
कोलंबिया विद्यापीठ हे एक वैश्विक ब्रॅंड आहे तिथे माझे लेखन पोहचले आहे याचे समाधान मला आहेच परंतु साध्या गावच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकुनही मी इंग्रजीचा व्यासंग कायम ठेवला आज माझ्या प्रायोगिक इंग्रजी लेखनाची दखल इतक्या मोठया स्तरावर घेतली जात आहे याचे समाधान आहे व तेवढीच माझी जबाबदारीही वाढली आहे असे अनिल सरमळकर यांनी या संदर्भात बोलताना सांगितले.
The Fox हे नाटक इंग्लंड येथील macthword प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या आधी हे नाटक अमेरिकन येल विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय नाट्य स्पर्धेत स्विकारले गेले होते तिथूनच या नाटकाची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत गेली आहे व त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली.
तसेच It’s Already Tomorrow हे अनिल यांचे The Fox त्रिनाट्यधारेतील दुसरे नाटक असुन ते Horizon प्रकाशनाच्या वतीने मुंबईत प्रकाशीत झाले आहे. हे नाटक ॲब्सर्ड शैलीतील असुन याही नाटकाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाट्यकर्मी समीक्षक विचारवंत इत्यादींनी दखल घेतली आहे.
दरम्यान The Fox व It’s Already Tomorrow ही दोन्हीही नाटके आता साक्षात कोलंबिया विद्यापीठात प्रवेश करती झाली आहेत हे नाटककार म्हणुन डॉ. अनिल सरमळकर यांचे आजवरचे अद्भुत व दैदिप्यमान यश आहे असे समजले जात आहे.तर कोकणचे सुपुत्र म्हणुन कोकणच्या रंगभूमीसाठी व कोकणसाठी हे यश अभिमानास्पद आहे त्याबद्दल लेखक कवी नाटककार डॉ. अनिल सरमळकर यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





