बांदा विठ्ठल मंदिरात श्रावणी श्रीरामनाम जपास प्रारंभ

18

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

बांदा विठ्ठल मंदिरात श्रावणी श्रीरामनाम जपास प्रारंभ

दरवर्षीप्रमाणे यंदाही परमपावन अशा श्रावण महिन्यात बांदा श्री विठ्ठल मंदिरात श्रीरामनाम जपास शुक्रवारपासून आरंभ झाला आहे. यावेळी ज्येष्ठ भजनकर्मी गिरीकाका महाजन, प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ, सोनू नार्वेकर यांच्या हस्ते गणेश वंदन ,श्री विठ्ठल रखुमाई तसेच श्री रामचंद्र प्रतिमा पूजन करून सर्व भाविकांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून जपास आरंभ करण्यात आला .

मंदिरातील सायं ७ वाजता होणाऱ्या नित्य आरतीनंतर दररोज जपास आरंभ केला जातो. श्रीराम जय राम जयजय राम या मंत्राच्या पाच माळा ओढल्या जातात. ग्रामस्थ, भाविक ,महिला, मुले सर्वजण यात सहभाग घेतात.
ज्यांना या जपात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी रोज सायं.७ वाजता आरतीच्या वेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.