सावंतवाडी (प्रतिनिधी)
व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घेतला भात(तरवा)लावणी करण्याचा प्रत्यक्ष अनुभव
येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी शेर्ले येथील लवू धुरी यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भात(तरवा)लावणीचा अनुभव घेतला.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्ही.एन.नाबर स्कूल मधील विद्यार्थ्यांनी कृती तुन शिक्षण घेण्यासाठी प्रत्यक्ष शेर्ले येथील लवू धुरी यांच्या शेतात जात भात (तरवा) लावणी केली.सर्व विद्यार्थी या लावणी प्रात्यक्षिक मध्ये सहभागी होत शेती करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. नांगरणी करुन चिखल कशा पद्धतीने करावा व त्यानंतर भाता ची लहान रोपे(तरवा) लावणीचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांना लवू धुरी, उन्नती धुरी यांनी शेती व्यवसायाविषयी माहीती देत मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, यांनी सुद्धा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शाळेचे क्रीडाशिक्षक प्रशांत देसाई, सहाय्यक शिक्षिका स्नेहा नाईक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सहकार्य करत स्वतः लावणी करण्याचा अनुभव घेतला.





