ठाकरे सेनेला ओंबळमध्ये धक्का | सरपंच, उपसरपंच भाजपमध्ये

125

देवगड : देवगड ओंबळ येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा धक्का दिला आहे. ग्रामपंचायत ओंबळचे सरपंच अरुण राजाराम पवार, उपसरपंच प्रवीण पवार यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे.

सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे सेनेला ओंबळ गावात खिंडार पडले आहे. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सरपंच अरुण राजाराम पवार, उपसरपंच प्रवीण पवार, यांच्यासह ग्रामस्थ शरद पवार, सहदेव पवार, जितेंद्र पवार, चंद्रकांत पवार, महेश ओंब ळकर, चंद्रकांत गावडे, नरेंद्र पवार ,राजेंद्र पवार, अजित पवार, प्रशांत पवार, आदींनी पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, डॉ अमोल तेली, संदीप साटम, बंड्या नारकर, अमित साटम, राजेंद्र शेट्टये, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ओंबळगावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांचे नेतृत्व गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन घेऊन गावच्या विकासाला गती देणार असे सरपंच अरुण पवार व उपसरपंच प्रवीण पवार यांनी सांगितले.