देवगड (प्रतिनिधी)
ठेकेदार आत्महत्या प्रकरणी देवगड ठेकेदार संघटना आक्रमक
जलजीवन मिशन योजनेचे सांगली जिल्ह्यातील तरुण व होतकरू कंत्राटदार हर्षल पाटील यांनी पूर्ण केलेल्या कामांची शासनाने देयके थकवल्याने आर्थिक अडचणीत येऊन नैराश्यामध्ये आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने देवगड ठेकेदार संघटनेने देवगड पंचायत समिती येथे जाऊन अभियंता ठेकेदार कै. हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उपअभियंता व गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले गेले.



