सावंतवाडी (मंगल कामत)
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून २५ जुलै रोजी बांदा येथे ग्रामीण, शहरी भागातील संशयित कर्करोग रुग्णांची केली जाणार मोफत तपासणी
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कोल्हापूर मंडळासाठी मंजूर झालेली ‘कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन’ (Cancer Diagnostic Van) आता सावंतवाडी तालुक्यात दाखल होणार आहे. ही विशेष व्हॅन ग्रामीण आणि शहरी भागातील संशयित कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी आणि निदान करणार आहे. यामुळे कर्करोगाचे लवकर निदान होऊन उपचारात गती येईल, अशी अपेक्षा आहे.ही कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सावंतवाडी तालुक्यात तीन ठिकाणी उपलब्ध असेल यात बांदाआरोग्य केंद्रात दिनांक 25 जुलै2025 रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार पर्यंत रुग्णांची तपासणी होणार आहे यामध्ये मुखाचा कर्करोग स्त्रियांच्या गर्भाशय मुखाचा कर्करोग व स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग यांची तपासणी तसेच सर्व रुग्णांचे बीपी शुगर व इतर आवश्यक असे रक्त चाचण्या होणार आहेत तरी सर्वांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी सावंतवाडी यांनी केले आहे.





