सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
दर्जेदार साहित्य वापरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवा ; पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या महावितरण अधिकऱ्यांना सूचना
धोकादायक पोल बदलून लाईनमन सतर्क ठेवा !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वारा, पाऊस असतो. त्यामुळे जे साहित्य वापरण्यात येते ते चांगल्या दर्जाचे वापरले पाहिजे. तसेच वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नको. गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करा. प्रत्येक गावासाठी एक लाईनमन देण्याचा प्रयत्न करा. नागरिकांचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा, अशा सूचना पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी पालकमंत्री नाम नितेश राणे यांनी ही आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद म्हनमोरे, सौरभ माळी, मनीष दळवी, अशोक सावंत, तालुक्यांचे सर्व वीज अभियंता उपस्थित होते.





