सावंतवाडी (प्रतिनिधी)
निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळाचे नूतन पर्व सुरू! लोकशाहीचा विजयरथ विद्यार्थ्यांच्या हाती
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचा अंतिम निकाल शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सकाळी मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी आपले प्रतिनिधी निवडल्याने विद्यालयाचे वातावरण उत्साहाने भारले होते. या निकालामुळे आता विद्यार्थ्यांच्या हाती जबाबदारीचे नवे पर्व आले आहे.गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना निकालाची उत्सुकता लागली होती. आज सकाळी ठीक १० वाजता प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती रुची देसाई मॅडम यांनी मतदानाचा निकाल घोषित केला. सभागृहात जमलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि घोषणांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
नवनिर्वाचित विद्यार्थी मंत्रिमंडळ खालीलप्रमाणेः
हेड बॉय : कु. आदित्य आशिष धावडे, इयत्ता नववी.
हेड गर्ल : कु. ऋतुजा कुसुमाकर मातोंडकर, इयत्ता आठवी.
सांस्कृतिक मंत्रीः कु. निलांशी निलेशकुमार पटेल, इयत्ता आठवी.
क्रीडा मंत्रीः कु. सोहम हरेश मुळीक, इयत्ता आठवी.
शिस्त मंत्री : कु. सिद्धराज विजय आचरेकर, इयत्ता नववी.
परीक्षा मंत्रीः कु. सोनू अजित नाईक, इयत्ता नववी. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाने आपल्या विजयानंतर बोलताना सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि त्यांना दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आम्ही सर्वजण मिळून विद्यालयाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणाली रेडकर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. रुपेश सावंत सर सी. इ.ओ. श्री. मनिष सावंत यांनी निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. “हा निकाल केवळ एक निवडणूक नसून, लोकशाही मूल्यांचे हे उदाहरण आहे. आम्हाला विश्वास आहे की हे मंत्रिमंडळ विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल आणि विद्यालयाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देईल,” अशा शब्दात उपस्थित सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचे संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ. शेखर जैन सर, संस्थेचे सन्माननीय सल्लागार हर्ष जैन सर, प्रशातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी अभिनंदन केले.





