दत्त मूर्तीची सत्यता तपासणीचे पुरातत्त्व खात्याचे आदेश

42

 

कणकवली (प्रतिनिधी)

दत्त मूर्तीची सत्यता तपासणीचे पुरातत्त्व खात्याचे आदेश

 जानवली कृष्णनगरी कणकवली येथील रहिवाशी मधुकर रामचंद्र मोहिते यांच्या मागील पडवीत खोदकाम करताना सापडलेल्या श्री दत्ताची मूर्तीची सत्यता तपासणीचे आदेश पुरातत्व खात्याने कणकवली पोलिसांना दिला आहे. दत्त मूर्तीची दत्त मूर्तीची सत्यता पडताळण्यात यावी, अशी मागणी अंनिसने पुरातत्त्व खात्याला निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची पुरातत्त्व खात्याने दखल घेतली आहे.

 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, अ‍ॅड   राजिव बिले, सचिव अजित कानशिडे व अन्य सदस्यांनी  ही मूर्ती पुरातत्व खात्याच्या ताब्यात द्यावी.  सदर मूर्ती सोन्याचीच आहे का आणि तिचे  वजन किती आहे ? तसेच पुरातन कालीन असल्याने किती वषार्पूवीर्ची आहे याचा तपास  करण्याची मागणी पोलीस निरीक्षक अतुल जाधव  यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर अंनिसच्या शिष्टमंडळाने सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग अभिरक्षित प्रादेशिक वस्तू संग्रहालय रत्नागिरी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना निवेदन दिले होते.

 

अभाअंनिस समितीच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन डॉ . विलास वाहणे सहाय्यक संचालक ( पुरातत्व ) विभागीय कार्यालय रत्नागिरी यांनी कणकवलीचे पोलीस निरीक्षक  यांना तात्काळ पत्र पाठवून सदर प्रकरणाची सत्यता पडताळून त्याबाबतचा अहवाल या कार्यालयात पाठविण्यात यावा जेणेकरून या प्रकरणाबाबत या कार्यालयात सत्यता कळेल, असे कळविले आहे.