देवगड हितवर्धक समाज व देवगड महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाककला स्पर्धेत सानिका कुळकर्णी, स्वाती पेडणेकर प्रथम

41

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड हितवर्धक समाज व देवगड महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाककला स्पर्धेत सानिका कुळकर्णी, स्वाती पेडणेकर प्रथम

देवगड हितवर्धक समाज आणि देवगड महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणगौरव व पाककला स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे विश्वस्त डॉ. विवेक रायकर (मालवण) यांच्या हस्ते पंचजोती प्रज्वलित करण्यात आले.

 

यावेळी व्यासपीठावर मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, देवगड हितवर्धक समाजाचे अध्यक्ष वसंत तळवडेकर, सुवर्णकार संघाचे अध्यक्ष महेश घारे, देवगड महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दर्शना कुळकर्णी, उपाध्यक्ष विवेक मोंडकर, सचिव दयानंद मोंडकर, खजिनदार निलरत्न कुळकर्णी, महिला मंडळाच्या उपाध्यक्ष स्वाती पेडणेकर, सचिव सौ. मालंडकर तसेच कार्यकारिणीचे इतर सदस्य उपस्थित होते.

 

समाजातर्फे विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंतकुमार कुळकर्णी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाककला स्पर्धा घेण्यात आली .

 

गोड पदार्थ प्रकारात
प्रथम क्रमांक — सानिका शुभम कुळकर्णी
द्वितीय क्रमांक — नम्रता निलरत्न मालंडकर
तृतीय क्रमांक — मयुरी महेश मोंडकर

 

तिखट पदार्थ प्रकारात
प्रथम क्रमांक — स्वाती निलेश पेडणेकर
द्वितीय क्रमांक — राजश्री राजन मोंडकर
तृतीय क्रमांक — लतिका शिवम कुळकर्णी

 

उत्तेजनार्थ पुरस्कार
नेहा राकेश पेडणेकर, वृषाली वसंत तळवडेकर, पल्लवी सुमित कुळकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.

 

संध्याकाळच्या सत्रामध्ये समाजाच्या वतीने विविध गुणदर्शन सादर करण्यात आले. या कार्यक्रमात मनस्वी घारे यांनी केलेले गायन विशेष लक्षवेधी ठरले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलरत्न मालंडकर यांनी केले. सूत्रसंचालन भाऊ मोंडकर आणि सौ. सायली मोंडकर यांनी केले, तर आभार आनंद मोंडकर यांनी मानले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. दर्शना कुळकर्णी (अध्यक्ष — देवगड महिला मंडळ), श्री. महेश घारे (अध्यक्ष — सुवर्णकार संघ) आणि श्री. वसंत तळवडेकर (अध्यक्ष — देवगड हितवर्धक समाज) यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

या कार्यक्रमाला समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.