प्राणजीवन संस्थेतर्फे मडूरा, रोणापाल प्रशालेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

12

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

प्राणजीवन संस्थेतर्फे मडूरा, रोणापाल प्रशालेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

 

शिरवल – कणकवली येथील प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने मडूरा व रोणापाल गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पाच प्राथमिक शाळा व दोन्ही गावातील अंगणवाडीतील सुमारे १०० हून अधिक विद्यार्थ्यांना रेनकोट वितरित करण्यात आले.
प्राणजीवन सहयोग संस्था दरवर्षी विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते. कोरोना काळात संस्था सदस्यांनी जीव धोक्यात घालून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मंदिरे सॅनिटराईज केली होती. कोरोना काळात सामाजिक प्रबोधन केले होते.
यावेळी मडूरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, प्राणजीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर, संस्था सावंतवाडी प्रतिनिधी अंकित प्रभू आजगावकर, वेंगुर्ले प्रतिनिधी गितेश शेणई,सावंतवाडी प्रतिनिधी मोहन गवस, राजन गावडे, सिताराम नाईक, मडूरा ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, शिक्षक मंजिरी झेंडे, लक्ष्मण बरागडे, प्रिया माधव, साक्षी कोलते, श्वेता राऊळ, श्रीमती पाटोळे, शुभेच्छा गवस, अंगणवाडी सेविका पल्लवी परब, उज्वला परब, पल्लवी गवंडी आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. उपसरपंच बाळू गावडे यांनी संस्था संचालकांचे आभार मानले.