बांदा (मंगल कामत)
विद्यार्थ्यांनी अंगी असणारे कौशल्य ओळखून त्या दुष्टीकोनातून प्रयत्न केले तर यश नक्की – भिकाजी धुरी
व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, बांदा मध्ये कौशल्य विकास दिन साजरा
विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कौशल्य प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः ओळखून त्या दुष्टीकोनातून प्रयत्न कराल तर नक्कीच यशस्वी व्हाल असे मत व्हाॅयकाॅन्ट स्कूल चे माजी मुख्याध्यापक श्री.भिकाजी धुरी यांनी व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील कौशल्य विकास दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर बांदा उपसरपंच राजाराम धारगळकर, उद्योजक संजय शिरोडकर, शंकर ऊर्फ भाऊ वळंजू, नारायण पित्रे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दिवाकर म्हावळणकर, मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.प्रतिक्षा शिरोडकर, माजी विद्यार्थी साहील बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यामध्ये फक्त आपल्या व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये एम.एस.ए.टी. सारखा कौशल्य विकास विषय शिकवला जात आहे. या प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत भविष्यात आकाशात उंच भरारी घ्यावी व आपले तसेच शाळेचेही नाव उज्ज्वल करावे असे मत श्री.भिकाजी धुरी यांनी बोलताना व्यक्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी कौशल्य विकास दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौशल्य विकास या विषयासंदर्भात मार्गदर्शन केले.
शाळेचा तसेच एम.एस.ए.टी. चा माजी विद्यार्थी सामील देसाई यांनी सुद्धा आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की मला या एम.एस.ए.टी. विषयाचा माझा पुढील महाविद्यालय शिक्षणात खुप उपयोग झाला. एकविसाव्या शतकाकडे झेपावताना तंत्रज्ञान चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नवनवीन शोध लागत आहेत आणि हे तंत्रशिक्षण भविष्यात तुम्हालाही खुप उपयुक्त असेल असे मत स्पष्ट केले.
आजच्या कौशल्य विकास दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धैच्या प्रथम तीन क्रमांकांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी बांधकाम उद्योजक श्री. संजय उर्फ हनुमान शिरोडकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांनी शाळेला वेळोवेळी मदतीचा हात दिला होता या निमित्ताने त्यांनी गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन ने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक श्री.भूषण सावंत , सुत्रसंचलन समन्वयक श्री राकेश परब, तर आभार निदेशिका सौ. गायत्री देसाई हीने मानले. यावेळी संकेत वेंगुर्लेकर, निदेशिका श्रीमती रिया देसाई , विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





