सावंतवाडी : मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात आज महाराजांचा 145 वा प्रगट दिन सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी सकाळी महाराजांची पाद्यपूजा, अभिषेक, धार्मिक कार्यक्रम, किर्तन, महाआरती, महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात स्थानिकांची भजने, भक्ती गीत, भावगीतांचा कार्यक्रम असे कार्यक्रम पार पडले.





