सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा आभाळाच्या रंगमंचावरचा सोहळा हजारों भाविकांच्या नेञ सुखाची अनुभवला . हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.
सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली 150 वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली. रविवार ( दि 6 ) रोजी सकाळी पावसाच्या वातावरणात आणि भर पावसात पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापुर, सोहोली, निमसोड, वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत- गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान , आत्तार, शेटे, आणि अन्य उंच ताबूत माना प्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. हा ताबूत उचलल्यानंतर ताबुतांच्या गळा भेटी सोहळ्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.यावेळी या हुसेन, हक हुसेन ,इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद चा जयघोष करीत मानाचा सातभाई- पाटील – बागवान – अत्तार – हकीम,देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 12 वाजता संपन्न झाल्या.
या भेटी म्हणजे राम-भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले. आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला.जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या रिपरिप मध्ये झालेल्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटी पाहताना भाविक मंत्रमुग्ध झाले.त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले.दरम्यान वाटेत तांबोळी, व अन्य ताबूत सहभागी झाले.या भेटी म्हणजे राम-भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले. आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक कडे निघाले.यावेळी इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धुला.. धूला आशा घोषणा देण्यात येत होत्या. दरम्यान वाटेत तांबोळी, व अन्य ताबूत सहभागी झाले.त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला.नंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत उचलण्यात आले. सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक या ठिकाणी एकत्रित केले गेले. त्या ठिकाणी मेलवाल्याकडून “महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकर”,”तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे” अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकऱ्री देशमुख शिंदे शेटे कुलकर्णी यांनी आणण्यात , आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. या ठिकाणी माना प्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले. दुपारी 3 वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले.
यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम,खासदार विशाल पाटील,आमदार अरुण लाड,माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,जितेश कदम,विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार,मुख्याधिकारी पवन म्हेत्रे ,उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक, सर्व ताबूत मालक व मानकरी , शुक्रवार पेठ व बुधवार पेठ मेलचे मानकरी, करबलचे मानकरी, मसूद माता , बारा इमामा पंजेचे मानकरी यांचेसह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.