अवघा आचरा झाले वैकुंठमय केंद्र शाळा आचराच्या पायी वारीने वातावरण झाले भक्तीमय

13

 

 

 

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

अवघा आचरा झाले वैकुंठमय केंद्र शाळा आचराच्या पायी वारीने वातावरण झाले भक्तीमय

टाळमृदंगाचा गजरात विठ्ठल रखुमाई सह अवघे वारकरी जनमिळून निघालेल्या केंद्र शाळे आचराच्या मुलांनी काढलेल्या पायी वारी फेरी मुळे आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला आचरा परीसर भक्तीमय बनला होता.

मुलांना आषाढ वारीचा अनुभव मिळावा या दृष्टीने केंद्र शाळा आचरे नं 1 तर्फे केंद्र शाळा ते आचरा तिठा दरम्यान दिंडी काढण्यात आली होती. विठ्ठल रखुमाई सह पावल्यांचा फेर धरत आषाढी एकादशीच्या पुर्व संध्येला निघालेली छोट्या मुलांची दिंडी आकर्षणाचा विषय ठरली होती. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या दिंडीचे आचरा तिठ्यावर सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ अर्पिता घाडी,उपाध्यक्षा सौ.अर्पिता घाडी,पालक देवेंद्र नलावडे श्री भालचंद्र घाडी श्री महेश मेस्त्री श्री मंगेश मेस्त्री , पंकज घारे , महेश पुजारे,विलास आचरेकर ,ग्रामपंचायत सदस्य सौ किशोरी आचरेकर ,राजेंद्र प्रसाद गाडसर मुख्याध्यापिका अनिता पाटील शिक्षक शारदा बिसेन,श्रीमती दिपाली खंडगावकर, श्रीमती मिरा बांगर, सिद्धेश हळवे,महेश चव्हाण,अंगणवाडी सेविका उषा चव्हाण, काकड आरती कार्तिकोत्सव मंडळाच्या लता घाडी यांसह अन्य पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.