देवगड (प्रतिनिधी)
किनारपट्टीवर भागात उधाणाचा कहर : मळई येथे मच्छीमार बांधवांच्या घरच्या अंगणात शिरले पाणी
देवगड जामसंडे नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी केली पाहणी ; प्रशासनाची सतर्कतेची सूचना
कुणकेश्वर येथे समुद्राच्या उसळत असलेल्या उंच उंच लाटा
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर वाढला असून, समुद्र खवळल्याने उधाणाचे रूप अधिकच भीषण झाले आहे.ताशी ३० ते ४० किलोमीटरच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किनाऱ्यालगत उंच उंच लाटा उसळत असून समुद्राला आलेल्या उधानामुळे किनारपट्टी भागातील घरांना धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.अनेक भागात खाडीलगत असलेल्या मच्छीमार बांधवांच्या
खाडीकिनारी नांगरून ठेवलेल्या होड्या नाहीं उधानाच्या पाण्याचा धोका निर्माण झाला होता.
हवामान खात्याने २६ ते २८ जून पर्यंत समुद्रात ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. उधानाच्या भरतीमुळे समुद्राचे पाणी किनारपट्टीलगत वस्तीपर्यंत पोहचले. मळई खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमार साहित्यांच्या झोपड्यांत पाणी गेल्याने साहित्याचे नुकसान झाले असून याची पाहणी नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि नगरसेवक रोहन खेडेकर यांनी केली यावेळी स्थानिक मच्छीमार नंदकिशोर भाबल आणि उमेश भाबल यांनी भरतीच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची माहिती दिली व मळई स्मशानभूमी ते मशीद पर्यंत किनाऱ्यालगत रस्ता होणे आवश्यक आहे असे सांगितले. आनंदवाडी जेटी प्रकल्पाचे काम सुरु असल्याने पाण्याची पातळी खाडीच्या दिशेने वाढली आहे असेही त्यांनी सांगितले.









