शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ६ जून रोजी जामसंडे येथील आप्पासाहेब गोगटे शासकीय औद्योगिक प – शिक्षण संस्था- देवगड येथे पंचपरिवर्तनावर आधारीत कार्यक्रम आयोजन  

9

 

 

देवगड / प्रतिनिधी

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ६ जून रोजी जामसंडे येथील आप्पासाहेब गोगटे शासकीय औद्योगिक प – शिक्षण संस्था- देवगड येथे पंचपरिवर्तनावर आधारीत कार्यक्रम आयोजन  

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ६ जून रोजी जामसंडे येथील आप्पासाहेब गोगटे शासकीय औद्योगिक प – शिक्षण संस्था- देवगड येथे पंचपरिवर्तनावर आधारीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ११ वा. देवगड येथील शां. कृ. पंतवालावलकर महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद भिडे यांचे ‘स्वदेशी विचारांचा प्रचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अॅड. अजित गोगटे उपस्थित राहणार आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पंचपरिवर्तनावर आधारीत कार्यक्रमाची संकल्पना राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राबविली असून शिवराज्याभिषेक दिवस कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये एकाचवेळी करण्यात येणार आहे.