शैक्षणिक संस्थेने देखील या शिक्षिकेला पाठविले सक्तीच्या रजेवर 

26

 

बांदा (प्रतिनिधी)

शैक्षणिक संस्थेने देखील या शिक्षिकेला पाठविले सक्तीच्या रजेवर 

        आपल्या मोबाईल व्हाट्सअपवर हिंदू धमियांच्या भावना दुखावणारा स्टेटस ठेवणाऱ्या बांदा शहरातील महिला शिक्षिकेविरोधात हिंदू एकता मंच आक्रमक झाले असून या शिक्षिके विरोधात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले करत आहेत.संबंधित शैक्षणिक संस्थेने देखील या शिक्षिकेला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
पहलगाम – काश्मीर येथे निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून अतिरेक्यानी गोळ्या झाडल्या. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले असून या घटनेचा व कृत्याचा जाहीर निषेध होत आहे. मात्र बांदा शहरातील एका शिक्षिकेने काल (गुरुवारी) रात्री आपल्या व्हाट्सअँपवर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारा स्टेटस ठेवत या घटनेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप हिंदू एकता मंचने केला होता. आज सकाळीच शहरातील हिंदू धार्मियांनी बांदा पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची भेट घेत चर्चा केली. संबंधित शिक्षिकेवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला
त्यानंतर संबंधित महिलेच्या शाळेत धडक देत हिंदू एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिली. जोपर्यंत या शिक्षिकेला बडतर्फ करण्यात येत नाही तोपर्यंत शहरातील मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या शिक्षिकेला तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
बांद्याची एकी ही जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. मात्र शिक्षिकेने केलेला प्रकार हा संतापजनक आहे. यापूर्वी देखील तिने समाज माध्यमावर अशाच आशयच्या पोस्ट टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचेसर्व पुरावे पोलिसाना देण्यात आले आहेत. यापुढे अशा प्रकारांना बांद्यात थारा दिला जाणार नाही.
— निलेश सावंत,. हिंदू एकता मंच