भाजप जिल्हाउपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; कनेडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा

20

 

कणकवली(प्रतिनिधी)

भाजप जिल्हाउपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; कनेडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपाध्यक्ष, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा ५१ वा वाढदिवस २७ मार्चपासून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर वारी, रस्सीखेच स्पर्धा, ड्रोन उडवणे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण, होम मिनिस्टर, पाककला स्पर्धा, वारकरी भजन स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.

 

कनेडी बाजारपेठ येथील भाजप नाटळ -सांगवे विभागीय कार्यालय येथे नाटळ व हरकुळ विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून गोटया सावंत यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

 

“खासदार नारायण राणे हाच आपला पक्ष आहे”. राणे कुटुंबीयांनी आपल्याला भरभरून दिले आहे. आपण राजकारणात कुठल्या अपेक्षेने काम करीत नसून समाजाच्या हितासाठी काम करीत आहे. जनतेने दिलेले प्रेम आपण विसरु शकत नाही.यापुढेही जनतेसाठीच काम करणार असल्याची ग्वाही गोट्या सावंत यांनी या सत्काराला उत्तर देताना दिली.

 

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ संजना सावंत, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था पालघरचे सचिव केदार चव्हाण, भाजप-नाटळ विभागीय अध्यक्ष विजय भोगटे,माजी सभापती सुरेश ढवळ ,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत ,ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश सावंत ,तसेच विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजप कार्यकर्ते संदेश प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.