सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात..

71

 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात..

सिंधुदुर्गनगरी येथे आज पालकमंत्री संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे लक्ष सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधा, याठिकाणी अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा, अमृत भारत योजना आदी विषयांकडे वेधले. पालकमंत्री श्री.राणे यांनी हा विषय खासदार श्री.नारायण राणे स्वतः हाताळत असून यावर ते लक्ष ठेवून आहेत, लवकरचं सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच हा विषय खासदार साहेबांना माझ्या परीने देखील सांगेन, असा शब्द पालकमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला. तसेचं सावंतवाडीच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत असेही त्यांनी नमूद केले.

 

पालकमंत्र्यांनी संघटनेच्या मागण्या नीट समजून घेऊन पुढील कार्यवाही करण्याबाबत आश्वस्त केले, प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी प्रवासी संघटनेचे सल्लागार श्री.सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर आदी उपस्थित होते.