सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पुरुष व महिला कबड्डी संघ जाहीर
19 ते 23 मार्च या कालावधीत ठाणे येथे होणाऱ्या वरिष्ठ गट पुरुष /महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या वतीने अध्यक्ष श्री रुजारियो पिंटो यांनी जाहीर केला असून निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.नुकत्याच मसुरे डांगमोडे येथे झालेल्या जिल्हा अंजिक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये सदर दोन्ही संघाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती .
सिंधुदुर्ग जिल्हा पुरुष संघ खालील प्रमाणे १) कुणाल बाळा गावडे,२) प्रतिक प्रदिप घाडी,३) प्रथमेश विलास आढाव,४) विराज संतोष बागवे,५) चेतन लाडू राणे -कर्णधार,६) अथर्व गुरुनाथ गावडे ७) गणपत संजय दाभोलकर,८)अक्षय गणपत चव्हाण,९)साहिल विश्वास तावडे,१०)बाळू गोपाळ तांबे,११)समील लक्ष्मण गावडे,१२)श्रीयांश सतीश मुरचीटे
प्रशिक्षक -पराग नीलकुमार वालावलकर व्यवस्थापक -विवेक गणपत नेवाळे सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघ खालील प्रमाणे१)रेशमा पांढरे,२)सेवा सचिन होडावडेकर,३)प्रतीक्षा रामदास शेलार, ४)साक्षी संजय मस्के५)सानिका पुंडलिक पावशे,६)मिताली संतोष गावडे, ७)सानिका मिलिंद नाईक,८)वैष्णवी मुकुंद नाईक,९)रिद्धी नितीन हडकर, १०)प्रज्ञा दिलीप शेटये,११)काजल संदीप नार्वेकर -कर्णधार,१२)पलक दिलीप गावडे, प्रशिक्षक -नितीन चंद्रकांत हडकर,व्यवस्थापक -राखी नितीन हडकर
सदर दोन्ही संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ठाणे येथे रवाना झालेले आहेत . सि .क.फेडरेशन चे प्रमुख आश्रयदाते तथा माजी पालकमंत्री श्री दिपक केसरकर, उपाध्यक्ष तथा माजी आमदार ॲड . श्री अजित गोगटे ,उपाध्यक्ष श्री दिलीप रावराणे यांच्यासह सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व संलग्न तालुका कबड्डी असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .