वैभववाडी ( प्रतिनिधी)
वैभववाडी तालुक्यातील शाळांना संगणक वितरण आणि शैक्षणिक अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न…
वैभववाडी तालुक्यातील शाळांना संगणक वितरण आणि शैक्षणिक अहवाल प्रकाशन सोहळा सोमवारी उत्साहात संपन्न झाला. वैभववाडी तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांसाठी संगणक वितरण आणि गेल्या तीन वर्षांत रेनोवेट इंडिया द्वारे झालेल्या शैक्षणिक कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा १७ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांना डिजिटल शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि आमंत्रितांच्या स्वागताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि रेनोवेट इंडिया प्रतिनिधींनी, तहसीलदार वैभववाडी, पोलीस निरीक्षक वैभववाडी, सांगुळवाडी प्रतीनिधी, गटशिक्षणाधिकारी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ पं.स. वैभववाडी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष वैभववाडी, मुख्याधिकारी नं.प. वैभववाडी, शिक्षण आरोग्य व क्रिडा सभापती वैभववाडी, महाराणा प्रताप शिक्षण संस्था प्रतीनिधी, वैभववाडी तालुक्यातील मान्यवर सरपंच तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय प्रतिनिधीनी सहभाग घेतला. या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
रेनोवेट इंडियाचे सह संस्थापक प्रथमेश रावराणे यांनी संस्थेअतर्गत चालत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रेनोवेट इंडिया गेली दहा वर्षे तळागाळातील संस्थाच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. यावर्षी ५ शाळा महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या संगणक प्रकल्पाच्या उपक्रमाची माहिती प्रथमेश यांनी दिली. त्यानंतर वैभववाडीतील शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा अहवाल प्रकाशन करण्यात आला. या उपक्रमाद्वारे शैक्षणिक विकासास चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार ,पोलीस निरीक्षक , गटशिक्षणाधिकारी पं.स. वैभववाडी,श्री प्रणय घोगले (मोसंबी कॉर्पोरेट), श्री आलोक कदम (रेनोवेट इंडिया), श्री चंदन बळीराम जाधव (सांगुळवाडी ग्रामस्य विद्या प्रसारक संघ), श्री प्रकाश सिताराम पाटील (माजी शाळा व्यवस्थापन समिती सांगुळवाडी), श्री शशिकांत रावराणे (एड्रॉइट कंपनी), नगराध्यक्ष्या सौ. श्रध्दा रोहित रावराणे, उपनगराध्यक्ष श्री प्रदीप रावराणे, मुख्याधिकारी नं.प. श्री प्रतिक थोरात,श्री बालाजी शिवराम रावराणे (सरपंच, सांगुळवाडी), श्री रोहन जयेंद्र रावराणे (शिक्षण, आरोग्य,क्रीडा सभापती- वैभववाडी) आणि श्री शरदचंद्र स. रावराणे (अध्यक्ष, सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ मुंबई) यांनी आप आपले विचार मांडले.





