सावंतवाडी (प्रतिनिधी)
ओरोस येथे सायबर क्राईम जनजागृती मार्गदर्शन अभियान कार्यक्रम संपन्न
जिल्ह्यात सध्या ग्रामसंवाद मार्गदर्शन अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सायबर क्राईम मार्गदर्शन संघर्ष महिला ग्रामसंघ दांडेली व कुटुंबश्री NRO केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे सायबर क्राईम जनजागृती मार्गदर्शन अभियान कार्यक्रम आयोजित आला होता. या सायबर क्राईम मार्गदर्शनाला महिलांसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे संघर्ष महिला ग्रामसंघाच्या वतीने स्वागत केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन,सरस्वती देवी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, सातार्डा पोलीस दुरक्षेत्रचे दिपक दळवी,दांडेली पोलीस पाटील चतुर मालवणकर ,सुचिता माणगावकर, कविता माणगावकर ,रचना माणगावकर , प्राची राऊळ ,प्रचिती मडूरकर ,सरिता मोरजकर ,लक्ष्मी बिरोडकर शाळेच्या शिक्षिका अनुष्का गावडे ,मोहन पालेकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानांतर्गत एकता महिला प्रभाग संघ, मळेवाड,संघर्ष महिला ग्रामसंघ दांडेली व कुटुंबश्री NRO केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राइम मार्गदर्शन आयोजित केले होते.या क्राईम मार्गदर्शनवर माहिती देताना सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की,सध्या ग्रामसंवाद अभियान राबविण्यात येत असून याबाबत गावागावात जाऊन, सायबर क्राईम विषयी जनजागृती करण्यात येत आहे. यात महिला सुरक्षा, मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम, सायबर गुन्हे,वेगवेगळे अँप, गेम या सारख्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून गुन्हेगार लोकांना लुटत असतात अशा गुन्हेगारी लोकांपासून सावध कसे राहायचे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सातार्डा पोलीस दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल दिपक दळवी यांनी महिलांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की, महिलांनी घाबरून न जाता एखाद्या प्रसंगाला तोंड देत मोठ्या जिद्दीने प्रतिकार करावा,कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. पोलीस आपल्याला सर्वोतोपरी मदत करतील असे आश्वासन दिले.तसेच पोलीस पाटील चतुर मालवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेचे शिक्षक मोहन पालेकर,शिक्षिका अनुष्का गावडे यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केलं.यावेळी दांडेली पोलीस पाटील चतुर मालवणकर ,संघर्ष ग्रामसंघ अध्यक्ष सुचिता माणगावकर, कविता माणगावकर कोषाध्यक्ष रचना माणगावकर ,बी आर पी प्राची राऊळ ,प्रचिती मडूरकर (प्रभागसंघ व्यवस्थापक,मळेवाड प्रभाग),सरिता मोरजकर ,लक्ष्मी बिरोडकर , रूपाली मोरजकर,शाळेच्या शिक्षिका अनुष्का गावडे ,मोहन पालेकर सर पाटील, अंगणवाडी सेविका श्रावणी नार्वेकर ,सृष्टी गोडकर,महिला वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेचे कर्मचारी विट्ठल शेळके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.अनुष्का गावडे, प्रस्तावना प्रचिती मडूरकर यांनी केलं.





