सत्तेच्या जोरावर शिवसैनिकांना त्रास देणार्यांचे प्रयत्न निष्फळ होतील…
सावंतवाडी : ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते अन्य ठिकाणी जावून आता शिवसेनेलाच निष्ठेच्या गोष्टी शिकवत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य तो धडा शिकविण्यासाठी सावंतवाडीत पुन्हा भगवा फडकावचा आहे.त्यामुळे आता अधिकचा लक्ष सावंतवाडीत देणार, असे अभिवचन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिले.
दरम्यान सत्तेच्या जोरावर माझ्या मागे ईडी लावून तसेच काही शिवसैनिकांना आमिषे दाखवून आणि काहींना धमक्या देवून त्यांचे पक्ष प्रवेश घेतले जात आहेत. परंतू काही झाले तरी शिवसेना संपणार नाही. हे विरोधकांनी ध्यानात ठेवावे, असे त्यांनी सांगितले. निरवडे येथील सुमारे साडे सहाशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वैभव नाईक बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, काही झाले आणि कोणी सांगितले तरी शिवसेना संपणार नाही तर जोमाने वाढणार आहे. सत्ताधार्यांना सत्तेचा माज चढला आहे. त्याच्या जोरावर अनेकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र काही झाले तरी ते त्यात यशस्वी होणार नाहीत. येणार्या लोकसभा निवडणूकीत सुध्दा पुन्हा विनायक राऊत हेच बहुमतांनी विजयी होतील,असा एक सर्व्हे पुुढे आला आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तेच राजकारणातून हद्दपार होतील, असे ही नाईक म्हणाले





