कुडाळ : मांडकुली गावची मोठी समस्या ही पुलाची होती अनेक पक्षांच्या नेत्यांनी अनेक वेळा आश्वासने दीली. मात्र मी या भागाचा जि प सदस्य झाल्यावर पाठपुरावा करुन खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडुन निधी मंजुर केला आणि आज पिंगुळी कुडाळ, मांडकुली असे शहरी करणाकडे गाव दीसु लागले असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले.
मांडकुली सरपंच व सदस्य शिवसेनेचे बिनविरोध निवडून आल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने खुद्द मांडकुली गावातच पडते यांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री पडते म्हणाले यागावचे तरुण उमद नेतृत्व तुषार सामंत यांनी या गावात विकासासाठी पाठपुरावा केल्यानेच विकासनिधी आला तसेच वैद्यकिय सेवा देऊन गोरगरीब जनतेचा सेवक बनला,कोरोना काळात अतिशय गावात चांगले काम केले याची जाणिव मांडकुली गावाने ठेवली म्हणुनच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ग्रामपंचायत शिवसेनेकडे दीली त्याबद्दल मांडकुली गावातील जनतेचे आभार मानुन या पुढे या गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशी ग्वाही श्री पडते यांनी दीली.
यावेळी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सरपंच सौ गोतमी कासकर, ग्रामपंचायत सदस्या स्वप्नाली पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ दीपाली चव्हाण, नवनिर्वाचित उपसरपंच तुषार सामंत,यांचा श्री पडते यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आनंद कासकर,सौ प्रतिक्षा प्रकाश धुरी, शाखाप्रमुख निलेश खानोलकर, सुरेश पेडणेकर,आबा सावंत, (डांबरेकर), रामचंद्र लाड, योगिता धुरी,कासले, उर्मिला कैटकर, नारायण धुरी इत्यादी उपस्थित होते.





