सर्वोदयनगर रहिवासी संघ अध्यक्षपदी सुनील राऊळ तर महिला अध्यक्षपदी सौ दिशा कामत यांची निवड

13

सावंतवाडी (प्रतिनीधी)

 

 

सर्वोदयनगर रहिवासी संघ अध्यक्षपदी सुनील राऊळ तर महिला अध्यक्षपदी सौ दिशा कामत यांची निवड

सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर येथील ‘सर्वोदयनगर रहिवासी संघ’ या रहिवासी बांधवांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संघाची सार्वजनिक सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 

या सभेमध्ये पुढील दोन वर्षासाठी संघाची सर्वानुमते समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक सुनील राऊळ यांची अध्यक्ष पदी तर महिला संघाच्या अध्यक्ष पदी सौ. दिशा कामत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर मेघना राऊळ यांची सचिव पदी, अजय गोंदावळे यांची उपाध्यक्ष, तसेच लक्ष्मीकांत कराड यांची सहसचिव व विद्याधर तावडे यांची खजिनदार पदी निवड झाली आहे. सर्वोदयनगर रहिवासी संघाची’ पुढील दोन वर्षासाठी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे असून यात एकूण 17 सभासदांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.