शेगाव स्थानकात नवजीवन एक्सप्रेसमध्ये अनोळखी वृद्ध महिलेचा आढळला मृतदेह

11

 

शेगाव (प्रतिनीधी)

शेगाव स्थानकात नवजीवन एक्सप्रेसमध्ये अनोळखी वृद्ध महिलेचा आढळला मृतदेह

नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्र. 12655) च्या जनरल डब्यात एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. अकोला दिशेने जाणाऱ्या या गाडीत शेगाव रेल्वे स्थानकावर तपासणी दरम्यान हा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला अंदाजे 60 वर्षांची असून तिची उंची 5 फूट 5 इंच, रंग गोरा, शरीरबांधा सडपातळ, लांबट चेहरा, लांब काळे-पांढरे केस व उजव्या मनगटावर तीळ आहे. तीने पोपटी रंगाची सलवार-कुर्ती परिधान केली होती. प्राथमिक तपासात महिलेचा मृत्यू कुठल्यातरी दुर्धर आजाराने झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्टेशन उपप्रबंधक यांच्या लेखी अहवालावरून शेगाव रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत महिलेबद्दल कोणाला काही माहिती असल्यास तपास अधिकारी एएसआय पंचकृष्ण खिराडे (मो. 8805641099) किंवा रेल्वे पोलीस स्टेशनच्या लँडलाईन क्रमांक (07265-253027) वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.