शरद पवार यांची राज्यपाल बदलीवर प्रतिक्रिया…!

185

नागपूर : राष्ट्रपती आणि केंद्र सरकारने राज्यपाल बदलीचा समाधानकारक निर्णय घेतला आहे. हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

तसेच राज्यपाल यांनी जे काही असंविधानिक निर्णय घेतले आहेत त्याची सुद्धा चौकशी व्हायला हवी , अशीही मागणी शरद पवार यांनी यावेळी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त कारकिर्दी नंतर आता त्यांच्या बदली पश्चात सुदधा विविध स्तरावरून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.