सावंतवाडी (प्रतिनीधी)
बिबट्याची मध्यरात्री बागेत इंट्री ; अचानक बिबट्या इंट्रीमुळे बागेतील कामगार भयभीत
सावंतवाडी डोंगरपाल गावातील मिलिंद शंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी दि. ०३ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता बिबट्याने अचानक दमदार एन्ट्री मारली आहे. परब यांच्या बागेमध्ये त्यांचे दोन कामगार वास्तव्यास असून. बिबट्याच्या आगमनाने घाबरले आहेत. बिबट्याने अचानक केलेल्या एन्ट्रीमुळे कामगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होऊन जिविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.





