मालवण स्पोर्ट्स क्लब आयोजित MPL लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५ पर्व आठवे. दि. २ ते ९ मार्च या कालावधीत मालवण बोर्डिंग ग्राउंड वर आयोजित केली आहे. विजेत्या संघाला ५५,५५५ रोख रक्कम व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला ३३,३३३ रोख रक्कम व आकर्षक चषक दिला जाणार आहे. अशी माहिती मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व क्लबचे उपाध्यक्ष गौरव राजेंद्र लुडबे यांनी प्रसिद्धपत्रद्वारे दिली आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी जे संघमालक इच्छुक आहेत त्यांनी लवकरच आयोजकांशी संपर्क करावा. या स्पर्धेचा खेळाडूंचा लिलाव ९ फेब्रुवारी रोजी असेल. या स्पर्धेमध्ये सर्व संघातील खेळाडूंची निवड प्रक्रिया लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे.तरी स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी प्रवेश अर्ज भरायचे आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून प्रवेश अर्ज भरायची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी आहे. खेळाडूंचे प्रवेश अर्ज गुड लाईफ मेडिकल, भंडारी हायस्कूल शेजारी, सोमवार पेठ मालवण येथे उपलब्ध आहेत. खेळाडूंनी फॉर्मसाठी पायस अलमेडा 9307915141 व साईराज हळदणकर +91 9764121892 यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत संघ घेण्यासाठी इच्छुक संघ मालकांनी आपले संघ दि. २ फेब्रुवारी पर्यंत फ्रँसिस फेर्नांडिस 9834052882 व गौरव लुडबे 9420890110 यांच्या जवळ नोंदवावे व स्पर्धे संबंधित अधिक माहिती करिता ज्ञानेश केळूसकर 7875972436 व सुशील शेडगे 7499955147 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.