बांदा वाफोली मार्गावरील गणेश नगर ,बांदा येथिल प्रसिद्ध श्री अष्टसिद्धी गणेश मंदिरात शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षाप्रमाणे *माघी गणेश जयंती* सोहळा साजरा होणार आहे. या सोहऴ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे ५ वाजता काकड आरती ,अभिषेक व पूजा, सकाळी ९ वा. श्री सत्यविनायक महापुजा, दुपारी 12.30 वा. गणेशजन्म सोहळा , १ ते 3 महाप्रसाद , सायंकाळी 7 वा. विविध भजने तसेच रात्रो ९ वा. दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा अजरामर लोकप्रिय नाट्य प्रयोग मयुरेश्वर सादर होणार आहे.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर सेवा समिती,बांदाच्या वतीने करण्यात आले आहे.