बांदा (प्रतिनीधी)
गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार
बांदा खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवणारे आदर्श, शिस्तप्रिय शिक्षक कै. कृष्णाजी वराडकर यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणारा बांदा ग्रामरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला.76 व्या प्रजासत्ताक दिनी बांदा गांधी चौक येथे गावाच्या एकत्रित झेंडावंदन सोहळ्यात बांदा सरपंच प्रियांका नाईक आणि उपसरपंच आबा धारगळकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कै. वराडकर सर यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र सुहास वराडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी या पुरस्काराची संकल्पना मांडणारे ग्रामस्थ नागेश सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.





