कुडाळ तालुक्यातील ओरोस भाजपच्या मंडळ अध्यक्षांसह 63 बूथ वरील 18 सरपंच, 18 शक्ती केंद्रप्रमुखांसह 55 बूथ अध्यक्षांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
कुडाळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या ओरोस मंडळ मधील भाजपच्या मंडळ अध्यक्षांसह 63 बूथ वरील 18 सरपंच, 18 शक्ती केंद्रप्रमुखांसह 55 बूथ अध्यक्षांनी आज भारतीय जनता पार्टीला सोडचिट्टी देत शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी बोलताना सांगितले की मी शांत आहे मला शांत राहू द्या, मी माझा पक्ष वाढवतोय जे एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे ना की महाराष्ट्रामध्ये संघटना कशी असावी ती संघटना सिंधुदुर्ग तुम्ही बघावी मी कोणाच्या अंगावर जाणार नाही, यावेळी माजी आमदारांना शुभेच्छा दिल्या.