कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील बांबुळी गावाची पुरातन ग्रामदेवता ‘श्रीदेव ब्रह्मेश्वर’ या शिवमंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य सुरू असून ग्रामस्थ आणि भाविकांच्या उदार देणगीतून मंदिराचे निम्मेअधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. भाविकांच्या आर्थिक मदतीबद्दल बांबुळी ग्रामस्थानी देणगीदारांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
यंदा धुमधडाक्यात व नव्या मंदिर वास्तूत संपन्न होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवात १२ ते १८ फेब्रुवारी या काळात दररोज रात्री ग्रामस्थांच्या अर्थसहाय्याने विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे, महिलांच्या फुगड्या, नामवंत मंडळींची दशावतारी नाटके, खेळ पैठणीचा हा रंगतदार कार्यक्रम, भजन, कीर्तन, रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आपण या महोत्सवी सोहळ्यात आपुलकीने सहभागी होऊन आनंद लुटावा अशी विनंती आहे.
मंदिराचे नूतनीकरण अद्याप सुरू आहे, ते वेळी पूर्ण होण्यासाठी भाविकांनी देणगी देऊन हातभार लावावा अशी अपेक्षा आहे, त्यासाठी बांबुळी ग्रामस्थ मंडळाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी वा श्री लक्ष्मण महादेव परब (सचिव) – 97696 89282 किंवा श्री. प्रशांत परब – 8830383971 यांच्याशी संपर्क साधावा असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.




