सावंतवाडी(प्रतिनीधी)
तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत RPD चे वर्चस्व
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्यावतीने प.पू.सानेगुरुजी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कै.दत्ताराम कृ. वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धा २०२४-२५ मध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि कॉलेज सावंतवाडी प्रशालेने वर्चस्व राखले आहे. मोठ्या गटात कु. मृणाली मोहन पवार (8 वी)हिने प्रथम क्रमांक तर कु. प्रणाली राजन घाटकर (8 वी) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच लहान गटात कु. आर्यन योगेश चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.





