सायकलला रिक्षाची धडक ; सायकल स्वाराला वाचविण्याच्या नादात रिक्षा पलटी ; वेंगुर्ले येथील घटना

39

 

वेंगुर्ला (प्रतिनीधी)

सायकलला रिक्षाची धडक ; सायकल स्वाराला वाचविण्याच्या नादात रिक्षा पलटी ; वेंगुर्ले येथील घटना

वेंगुर्ला एस टी स्टॅन्ड नजीक मुख्य रस्त्यावर रिक्षा – सायकलच्या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात आज रविवारी सकाळी ८.०० च्या दरम्यान एस टी स्टॅन्ड चा समोरील हॉटेल भगवान च्या समोर घडला.

येथील एक न्यूज पेपर विक्रेता नेहमी प्रमाणे पेपर टाकत जात होता.दरम्यान ‘हॉटेल भगवान’ च्या समोर येताच समोर येणाऱ्या रिक्षेला सायकलची धडक बसली,यात सायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा वरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे रिक्षा पलटी झाली व त्यात रीक्षेचे मोठे नुकसान झाले.सायकल स्वाराला किरकोळ दुखापत झाली.