आचरा (अर्जुन बापर्डेकर)
आचरा गाव झाला निर्मनुष्य मंदिरासह घरादारांचे दरवाजाही झाले बंद
निनादणारया चौघड्याचा आवाज भेदत तोफेचा आवाज झाला.गावकरयांना गाव सोडण्याचा इशारा झाला. बारापाच मानकरयांनी मंदिराचे प्रवेश द्वार पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला.मंदिराच्या पुढील दरवाजालाही कुलूप ठोकले.नौबत दणाणत होती आणि आचरे ग्रामस्थ आपली घरेदारे बंद करून गुरेढोरे कोंबडी कुत्र्यासह आपल्या नियोजित स्थळी वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गुरेढोरही जणू गावपळणीच्या ओढीने मालकासोबत वेशीबाहेर जाण्यासाठी हुंदडत निघाली होती.






