सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एका अधिकाऱ्याचा मनमानी कारभार सुरू असून याबद्दल जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त

363

 

सावंतवाडी (प्रतिनीधी)

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एका अधिकाऱ्याचा मनमानी कारभार सुरू असून याबद्दल जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त 

महसूल विभाग हा तसा वादात असणारा शासकीय विभाग आहे. या विभागात सर्व सामान्य जनतेची जास्त कामे असल्याने सर्वसामान्य जनतेची या विभागाची नाळ जोडलेली असते.जमिनी बाबत खटला,कुटुंबासाठी लागणारे दाखले असोत किंवा रास्त धान्य या संदर्भात नियमित जनतेची या कार्यालयात ये जा असते. सावंतवाडी पुरवठा विभागात एका अधिकाऱ्याचा महिनाभर मनमानी कारभार सुरू आहे. रेशन धारक जर रेशनच्या कामासाठी आले तर त्यांना विसंगत उत्तर देणे, दाखले वेळेत न करणे, शिधा पत्रिका काम वेळेत न करणे अशा मुख्य कामांचा सहभाग आहे. पुरवठा विभागातील कामकाज बाबत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी काही व्यक्तींनी संपर्क साधून तक्रारी केल्या. मात्र या अधिकाऱ्याच्या वागणुकीत कोणताही बदल न झाल्याने येरे माझ्या मागल्या अशीच तशी दिसून येत असून आपल्या वरिष्ठांना पण हा जुमानत नाही का? असा प्रश्न पडला आहे.
रास्ता दुकानदार यांच्याकडे महिन्याकाठी आर्थिक पैशाची मागणी,सीएससी सेंटर धारक यांच्याकडेही लॅपटॉपची मागणी,तसेच रेशन कार्डधारक, दाखला लाभार्थी यांच्याकडे पैशाची मागणी होत असल्याची चर्चा सावंतवाडी कार्यालयात जोर धरत आहे. यामुळे खरोखरच पैशाची मागणी केली जाते का? यासंदर्भात खातरजमा करून तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कठोर भूमिका घेवून पैशाची मागणी होत असेल तर पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करावे अशीही मागणी जनतेतून केली जात आहे.
अन्यथा लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाण्याशिवाय जनतेकडे दुसरा पर्याय नसेल अशीही चर्चा आहे. त्यामुळे पैशासाठी सर्वसामान्य जनतेचा बळी पाडू पाहणारा *वाघ* कोणाच्या जाळ्यात अडकतो याकडे सर्वांचं लक्ष लागुन राहिले आहे.