कोकण मार्गावर आणखी सहा गाड्या विद्युतशक्तीवर धावणार…!

177

दोडामार्ग : कोकण रेल्वे मार्गावर आणखी ६ रेल्वेगाड्या डिझेल इंजिनऐवजी विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नियमितपणे धावणाऱ्या दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेससह अन्य ५ साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यामुळे विद्युत इंजिनावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या २९ वर पोहचणार आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाल्याने एकामोगामाग एक रेल्वेगाड्या विद्युतशक्तीवर धावत आहेत. आतापर्यंत २३ रेल्वेगाड्या विद्युतशक्तीवर धावत होत्या. यात आणखी ६ गाड्यांची भर पडल्याने ही संख्या २९ वर पोहचणार आहे. विजेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान व प्रदूषणमुक्त होत आहे.